दहा हजार रुपयात आयफोन 14 pro Max बाजारात दाखल ? -Realme C53

Saptarang marathi

रियलमी कंपनीने भारतात नवीन स्मार्टफोन Realme C53 लॉन्च केला आहे. हा एक बजेट कॅटेगिरी मधील स्मार्टफोन आहे.. हा फोन एप्पल iPhone 14 pro प्रमाणे डिझाईन असलेला फोन आहे… या स्मार्टफोनची विशेष गोष्ट म्हणजे दहा हजार रुपयांच्या कॅटेगिरीमध्ये 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा या स्मार्टफोनला देण्यात आला आहे….

Realme C53 स्पेसिफिकेशन पुढील प्रमाणे

कॅमेरा

Realme C53 या फोनची खासियत म्हणजे या फोनचा कॅमेरा आहे. या फोनमध्ये आपल्याला मेन 108 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. तर फ्रंट सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे.. तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी मेन कॅमेऱ्याने 1080P @30fps फुल एचडी पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतो. तर फ्रंट कॅमेरयाने 720P @30fps HD व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण करू शकतो..

image by Flipkart

डिस्प्ले

Realme C53 या फोन मध्ये आपल्याला 6.74 इंच 720p ( एचडी) IPS LCD स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच या फोनच्या डिस्प्ले चा रिफ्रेश रेट 90hz एवढा आहे. तर डिस्प्ले ब्राईटनेस 560 नट्स एवढा आहे..

बॅटरी

Realme C53 या स्मार्टफोनमध्ये 5000mAH बॅटरी देण्यात आली आहे तसेच यामध्ये आपल्याला 18w फास्ट चार्जर मिळतो. तर हा स्मार्टफोन 33w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. आणि या मध्ये रीवर्स चार्जिंग चा ही सपोर्ट देण्यात आला आहे..

प्रोसेसर

Realme C53 मध्ये Unisoc T612 ऑक्टा कोअर प्रोससर देण्यात आला आहे.हा प्रोसेसर 12Nm बेसड आहे. आणि यामध्ये जीपीयु – ARM mali G57 देण्यात आला आहे..

मेमरी-

या स्मार्टफोनमध्ये आपल्याला दोन स्टोरेज व्हेरिएंट मिळतात यामध्ये 6Gb रॅम 64Gb स्टोरेज सह तर 4Gb रॅम 128Gb स्टोरेज सह या स्मार्टफोनमध्ये मध्ये virtual Ram चा ही सपोर्ट देण्यात आला आहे..

नेटवर्क

हा स्मार्टफोन बजेट कॅटेगिरी मधील असल्यामुळे यामध्ये आपल्यालाbRealme कंपनी कडून 5G सपोर्ट देण्यात आला नाही हा फोन 4G सपोर्टेड आहे..

डिझाईन

या स्मार्टफोनचा thikness 7.99mm आहे. एकदम प्रीमियम फोन प्रमाणे या फोनचे डिझाईन आहे. ऍपल iPhone 14 pro प्रमाणे याचे डिझाईन दिसते..

कलर

हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरीयट मध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये champion gold (चॅम्पियन गोल्ड), champion black (चॅम्पियन ब्लॅक) हे दोन कलर वेरियंट उपलब्ध आहेत…

किंमत

4Gb रॅम 128 Gb स्टोरेज – 9999/-

6Gb रॅम 64Gb स्टोरेज – 10999/-

रीलमी c५३ विशेषता

हा स्मार्टफोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन साईडवरती उपलब्ध होणार आहे.

108mp camara

Unisoc T612 processor

5000mAH battery

6.74 inch HD display

#realme_c53 , #Apple_iphone14 ,

Leave a Comment